गोष्ट मला ब्लॉगिंगचा छंद लागण्या मागची..

सन २००७ मधे मी दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होउन मी लागलीच अभियांत्रिकी तंत्रनिकेतन मधे दाखला घेतला , पहिल्यांदाच मी गाव कडचे गावरान वातावरण सोडून शहरा कड़े विद्यार्थी वसतिग्रुहा मध्ये रहायला गेलो होतो. संगणक शास्त्रा मधे मला जाम रूचि होती.

मना मध्ये उत्सुकतापूर्ण प्रश्नाचा ढीग झालेला होता, संगणक कसा चालतो, इंटरनेट कसा चालतो, वेबसाइट कशी बनवतात, डाउनलोड कसे करतात, सी. डी. कशी भरतात …  हे प्रश्न मला लवकर झोप लागू देत नव्हते . प्रथम सेमिस्टर मध्ये तर आम्हाला फक्त संगणक कसे हाताळायचे हेच समजले.

एक दिवस प्रयोगशाळेत असताना, एक बारीक अंगकाठी , डोळ्यांवर चस्मा असलेल्या साधारण दिसणारे शिक्षक माझ्या जवळ आले  .. त्यांनी मला ओळखले कि काय हा गावाकडचा मुलगा आहे म्हणून .. माझे नाव गाव विचारले आणि लगेच एक एम. एस. ऑफिस वरचे काम देऊन टाकले .. आयडी कार्ड बनवायचे.  अशी माझी पहिली ओळख श्री तुषार कुटे यांच्याशी झाली

मग आले द्वितीय सेमिस्टर , आणि श्री तुषार कुटे हे आम्हाला प्रोग्रामिंग शिकवायला आले. प्रोग्रामिंग चे विषय शिकवण्या साठी त्यांनी स्वतः काही नोट्स व सराव प्रश्नपत्रिका तयार केलेल्या होत्या. अभ्यास करण्यासाठी त्याची प्रिंट तर कधी कधी सॉफ्ट कॉपी आम्हाला देत. त्याचा आम्हाला खूप फायदा होत होता . त्यासाठी तयांनी गुगल साईट्स वर विषयानुसार काही साईट तयार केल्या आणि सर्व सॉफ्टकॉपी त्यावर उपलोड केली

 सर्व सॉफ्टकॉपी त्यावर उपलोड करून त्याचा पत्ता आम्हाला दिला . आम्ही त्या साईटवर जाऊन लागेल ते मटेरियल डाउनलोड करून घेत होतो .  हळूहळू मला माहित पडले कि भाऊंचा ब्लॉग देखील आहे.

मग काय चेल्याला गुरुजींची नक्कल करून पाहिल्याशिवाय राहवेना , आणि एक ब्लॉग बनवून टाकता ब्लॉगर वर. पहिली पोस्ट म्हणून स्वतःबद्दल थोडेफार लिहले .

पहिल्या ब्लॉगपोस्ट ची सुरवात

काही दिवसांनी एक इमेल आला, जीमेलच्या इनबॉक्स मध्ये … कुणीतरी तुमच्या ब्लॉगवर कंमेंट मारली आहे म्हणून ..जाऊन बघतो तर काय .. गुरुजींनी चेल्याला शाब्बासकी दिलेली होती.. असा असतो गुरु.

अन काय, !!

मला ब्लॉगिंगचा छंद लागला .

श्री तुषार कुठे यांनी केलेली कंमेंट

अजूनही शिकता शिकता ब्लॉगिंगचा छंद सुरु आहे.

मग कशी काय वाटली माझी गोष्ट ?  मारा कि तुम्ही पण एक कंमेंट.

You might also like
Comments