सरदार वल्लभ भाई पटेल यांचे स्मारक भारत सरकारला आर्थिकदृष्ट्या फायद्याचे की तोट्याचे आहे?

आमच्या गावाकडे काही पुढारी लोक राहतात. त्यांचे आयुष्य हे कडक कपडे, बुलेट गाडी, महागडी कार, कडक टोपी घालून जगण्यातच जात आहे. आता मला सांगा, त्यांच्या असे महागडे जीवन जगण्यात कोणाचा फायदा आहे का? त्यांचा स्वतःचा चांगले दिसण्या शिवाय काही ठोस फायदा आहे का ? हे सगळे खर्च ते टाईट फाईट मानाने जगण्यासाठी करतात, नातेवाईक पैसे नसल्याने कसेही जगत, मरत असो!

महागडी गाडी घेतल्याने गाडी विकणाऱ्याचा फायदा आहे, तशाच प्रकारे भला मोठा पुतळा चायनीज कंपनीकडून उभा केल्याने कोणाचा फायदा होणार? ज्या तालुक्यात तो पुतळा आहे त्या तालुक्यात जरा चक्कर मारून बघा, लोकांची परिस्थिती ह्यापेक्षा चांगले उत्तर देईल.

You might also like
Comments